
आंबेबहुला (प्रतिनिधी ) .आंबेबहुला ता.जि.नाशिक येथे क्रांतीकारक महापुरूषांची विचारधारा जोपसणारे *आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष रामु तुकाराम इदे व मातृशक्ती हिराबाई रामु इदे* यांच्या घराची घरभरणी क्रांतीकारक महापुरूषांना अभिवादन करून संपन्न झाली.आदिवासी निसर्ग पुजक असून तो निसर्गाच्या सान्निध्यात राहतो व त्याला आपला दैवत मानतो.त्यामुळे घरभरणी पुजाची मांडणी धरतीआईची प्रतीकृती, सूर्य, चंद्र,जल, जमीन, जंगल, पाणी, अग्नी, पशू, पक्षी, डोंगर,नर,नारी, कणीकणसरा, धनधान्य, फळे,व क्रांतीकारक महापुरूषांच्या प्रतिमांची मांडणी करण्यात आली.व त्यांची आदिवासी रितीरिवाज परंपरेने पुजा विधी करून क्रांतीकारक महापुरूषांना अभिवादन करण्यात आले

.सामाजिक कार्यकर्ते *आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे यांनी* आदिवासी संस्कृती व क्रांतीकारक महापुरूषांची विचारधारा याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की, आदिवासी हा निसर्गपुजक आहे त्यामुळे आपण निसर्गाला हानी न पोहोचवता त्याचं संगोपन केले पाहिजे.आपल्या क्रांतीकारक महापुरूषांनी जल जमीन जंगल वाचविण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.गोरगरीब जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा दिला आहे.त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचे विचार समाजात रूजवले पाहिजे.असे ते म्हणाले.तसेच पुजा विधी मध्ये धरतीआईची आळवणी *

आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे प्रवक्ते लक्ष्मणभाऊ तळपे यांनी केली.कार्याध्यक्ष गंगारामभाऊ तळपाडे व कोषाध्यक्ष सिताराम भाऊ मदगे* यांनी पुजा विधी ची मांडणी केली.आदिवासी रितीरिवाज परंपरेची व क्रांतीकारक महापुरूषांच्या विचारधारेची घरभरणी आपल्या प्रत्येक आदिवासी बांधवांनी केली पाहिजे असे कौतुक करत उपस्थित असलेल्या बांधवांनी म्हटले.या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
