
सिन्नर (प्रतिनिधी )११ मे २०२६ महात्मा पदवी बहाल दिन महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने उत्साहात साजरा
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा पुतळ्यास नगरसेविका आशाताई जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हाणाले की*
११ मे १८८८ रोजी मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे असलेल्या वडगांव गादी रघुनाथ अर्थात रघुनाथ महाराज सभागृह मध्ये झालेल्या कार्यक्रमात मुंबईतील कष्टकरी जनतेच्यावतीने जोतीराव फुलेंना ” महात्मा” पदवी प्रदान केली होती. त्याचे हे स्मरण…
११ मे १८८८ रोजी जोतीराव फुलेंच्या वयास साठ वर्ष पुर्ण झाली होती.त्यांनी निवडलेला जीवनमार्ग कडकडीत व खडतर होता. या मार्गावर ते सतत चाळीस वर्ष चालत होते.ती एक सामाजिक तपश्चर्या होती. या काळात त्यांना पुरेशा सोयी-सुविधा नसतांनाही महाराष्ट्राचा कानाकोपरा धुंडाळून काढला होता.
*डाॅ.जी एल पवार म्हणाले की* ब्राह्मण स्त्रियांचे जे उग्र प्रश्न ब्राह्मणांनी सोडवायचे होते, ते या माळ्याच्या पोराने सोडवले होते. समस्त ब्राह्मण समाजावर माळी समाजाचा व जोतीराव फुलेंचा हा हिमालयाऐवढा उपकार आहे, जो ब्राह्मणांनी अजूनही फेडलेला नाही!अशा म्हणाले
*विजय मुठे म्हणाले की*.छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या शोधा बरोबरच पहिली शिवजयंती साजरी करून महाराजांवरती पहिला पोवाडा लिहिला.शेतकऱ्यांची दयनीय अवस्था का झाली हे शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातुन दाखवून दिले.
*डॉ. श्यामसुंदर झळके म्हणाले की* जोतिराव फुले हे पहिले समाजसुधारक ठरतात.अज्ञानाच्या अंधकारत अडकलेल्या बहुजन समाजाला. ज्ञानाच्या प्रकाशात आणण्यासाठी जीवनभर ज्यांनी कार्य केले अस्पृश्यतेच्या विरोधात कृतिशील आंदोलन केले.स्वत:च्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली *डाॅ.आर.टी.जाधव म्हणाले की* चळवळी, अनेक विचारवंत व समाजसुधारक उदयास आले. जोतिरावांच्या नेतृत्वात भारतातली पहिली कामगार संघटना उभी राहिली. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे दिन बंधू वृत्तपत्र उभे राहिले. सत्यशोधक समाज स्थापन करून सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या मध्ये समाविष्ट करून घेतले. *डाॅ.दशरथ रुपवते म्हणाले की* समाजसुधारकाच्या प्रति आदर म्हणून मुंबई मधील भायखळा येथे असलेल्या रघुनाथ महाराज सभागृहामध्ये मुंबईयेथील जनतेने जोतिराव फुलेंना वयाच्या ६१ व्या वर्षी महात्मा ही पदवी बहाल केली. *देवा भाऊ सांगळे म्हणाले की*.सदरील समारंभास रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे,रावबहादूर वंडेकर,स्वामी रामय्या अय्यावारू, मोरो विठ्ठल वाळवेकर इत्यादी मातब्बर मंडळी उपस्थित होती
*यावेळी कॉम्रेड हरिभाऊ तांबे व नगरसेविका आशाताई जाधव तसेच राजेंद्र जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले*
*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवा सातभाई यांनी केले व प्रास्तविक विजय मुठे यांनी केले तर आभार अजय लोंढे यांनी मांडले*
महात्मा फुले कि जय जय ज्योती जय क्रांती या जयघोषांनी परिसर घोषणा देण्यात आले
यावेळी नगरसेविका गटनेते आशाताई जाधव महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे डॉ. जी एल पवार डॉ. आर टी पवार डाॅ. शामसुंदर झळके एसटी कामगारांचे नेते देवा भाऊ सांगळे दत्ता जाधव विष्णू वाघ शिवा सातभाई अजय लोंढे खेतन मुठे कैलास वरंदळ कॉम्रेड हरिभाऊ तांबे सागर काकड निवृत्ती काकड भानुदास मुठे,किरण मुठे,
