
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२६७ वा दिवस
'परमभक्ती आणि चरम ज्ञान एकच होत'. परंतु ईश्वरासंबंधीच्या निरनिराळ्या मतांची नुसती चर्चा करून भागणार नाही त्याच्यावर निःस्वार्थ प्रेम करायला हवे. त्याच्या प्राप्तीसाठी साधना करायला हवी. संसाराचा आणि सांसरीक गोष्टींचा त्याग करायला हवा. दैनंदिन कर्तव्य व विचार देखील भगवंताच्या आसऱ्याने तद्भावभावित होऊन करणे शक्य आहे. आहार करताना समजावे की भगवंतालाच आहुती देत आहोत, झोपण्यासाठी अंग टाकले असता समजावे त्याला साष्टांग दंडवत घातले आहे, निद्रा म्हणजे त्याचे ध्यान अशी भावना ठेवावी. सर्व कार्यात, सर्व वस्तूत भगवंताला बघा. दुसऱ्याशी बोलाल ते देखील भगवंतासंबंधितच बोला. सदा ईश्वरीय गोष्टीच बोला. हे साधनेस खूप सहाय्यक आहे, खूप शुभंकर आहे. भगवंताची आणि त्याच्या सर्वात थोर अशा संतानांची, सत्पुरुषांची कृपा प्राप्त करून घ्या. भगवंत लाभाचा हाच प्रमुख मार्ग आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास २१ शके १९४८
★ वैशाख वद्य /कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. ११ मे २०२६
★ १८९५ भारतीय तत्वज्ञानी जे कृष्णमूर्ती यांचा जन्मदिन
★ १९५१ गझनीच्या महंमदने उध्वस्त केलेल्या बारा जोतिर्लिंगापैकी एक सोमनाथ मंदिरात राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
★ राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान दिन.
