
पिंपरखेड -(प्रतिनिधी) कै.पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयाने निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली असून विद्यालयाचा एकूण निकाल ९३.८४ % ईतका लागला आहे. यात डिस्टिंक्शन मध्ये ७, फर्स्ट क्लास मध्ये ३०, सेकंड क्लास मध्ये २० तर पास क्लास मध्ये ४ असे एकूण ६५ पैकी ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पहिले ५ गुणवंत विद्यार्थी
१)प्रथम – कुमार – इंगळे पुष्कर बाळासाहेब – ९२.८०%
२) द्वितीय – कुमारी – सोर अपेक्षा शिवाजी – ८४.२०%
३) तृतिय-कुमारी – मोरे मृणाली पुंजाराम – ८१.२०%
४) चतुर्थ – कुमारी – काळे ऋतूजा सोमनाथ – ८१%
५)पाचवी – कुमारी – कांदळकर धनश्री वाल्मिक – ८०%
गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व सन्माननीय संचालक, विजय शिक्षण प्रसारक मंडळ पिंपरखेड तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद कै.पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालय पिंपरखेड यांनी अभिनंदन केले आहे.
