
नाशिक (प्रतिनिधी ) वसंत नगर मधील तारवालानगर बहुउद्देशीय संस्था यांचे तर्फे दिनांक 17 मे ते 21 मे 2026 या कालावधीमध्ये पाच दिवशीय वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी दिली .दिनांक 17 मे रोजी प्रभागाचे नगरसेवक श्री सागर लामखेडे यांच्या हस्ते सदर व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे सदर व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष असून व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी पदाधिकारी प्रयत्न करीत आहे. दिनांक 17 मे रोजी माजी पोलीस उपायुक्त श्री संजय अपरांती यांचे देशबांधणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयावर व्याख्यान होणार आहे. दिनांक 18 मे रोजी नाशिकचे प्रसिद्ध विधी तज्ञ श्री जयंत जायभावे यांचे संविधान साक्षरता लोकशाहीचा गाभा 19 मे रोजी नाशिकचे प्रसिद्ध साहित्यिक व कवी नरेश महाजन यांचे चिंता मुक्तीचा पासवर्ड प्रसन्न काव्य मैफील होणार आहे 20 मे रोजी प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शेखर चिरमाडे यांचे मेंदू आणि विकार ज्येष्ठांच्या समस्या या विषयावर मार्गदर्शन होणार आहे तर 21 मे रोजी नाशिकचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल यांचे मधुकर झेंडे यांनी लिहिलेल्या चौकांचा इतिहास या विषयावर मार्गदर्शन होणार आहे सदर पाच दिवसाच्या व्याख्यानमालेसाठी प्रायोजक म्हणून श्री राजेंद्र श्रावण म्हसदे, श्रीमती नलिनी जोशी, श्रीमती कल्पनाताई बारड, श्री अरविंद व वसंत ब्राह्मणकर व मीनाताई बत्तासे हे आहेत सदरची व्याख्यानमाला तारवाला नगरीतील राजमाता जिजाऊ क्रीडा नगरामध्ये संपन्न होणार आहे व्याख्यामाला संपन्न होण्यासाठी अशोकनाना कोतवाल, शेखर ढेपे, दौलतराव पवार, अशोक जगताप, बाळनाथ व्यवहारे राजेंद्र म्हसदे, प्रवीण खैरनार व छाया थोरात प्रयत्नशील आहेत
