.

*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२६६ वा दिवस* *सेषा प्रसन्न वरदा नृणां भवति मुक्तये* ती जगन्माता प्रसन्न झाल्यास माणसाला वर (आशिर्वाद) देऊन मुक्त करते. या महामायेला पूजावंदनादीद्वारा जोवर प्रसन्न करून घेत नाहीत, तोवर काय मजाल आहे ब्रम्हा-विष्णू-महेशादिकांची देखील की, ते तिच्या हातून सुटून मुक्त होऊ शकतील? भारतात आदर्श स्त्रिजीवन म्हणताच एकमात्र मातृभावाचीच कल्पना आम्हा भारतीयांच्या मनात येते. माता हे निस्सीम प्रेमाचे प्रतीक आहे, ज्यामध्ये कधीही व्यवहार नसतो. भूतलावरील परमेश्वराचे साक्षात स्फुर्लिंग म्हणून आपण मातेची आळवणी करतो. बालपणी मुलामुलींनी नित्यनेमाने आपल्या मातेच्या चरणी मस्तक ठेवून, त्या चरणांचे तीर्थ घ्यावे, अशी आमची संस्कृती आहे. माता ही केवळ जन्मदात्री नसून, ती जगत्जननी आहे, जी आपल्यातील सुप्त शक्ती, कुंडलिनी जागृत करते. *स्वामी विवेकानंद…*

*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास २० शके १९४८
*★ वैशाख वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. १० मे २०२६
★ १९१८ रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्मदिन
★ १९९८ पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा स्मृतीदिन
★ २००१ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक मातृत्व दिन
★ मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृत्व दिन असतो
★ मातृत्व दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
