
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर——- सत्तर, ऐंशीच्या आणिबाणीच्या कालखंडात जबरदस्ती नसबंदी व हम दो, हमारे दो या कायदयामुळे, तसेच वंशाला दिवा हवा या हट्टापायी गर्भ लिंग चाचणी व स्री भ्रुण हत्याचे विपरीत परिणाम आज पहायला व भोगायला मिळत आहे. आज समाजामध्ये मुलगा व मुलगी यांचे संख्या प्रमाण विपरीत झाले असुन मुलाचीं वाढती संख्या व मुलीचें घटते प्रमाण यामुळे लग्नाच्या बाजारात असंख्य मुलाचें पदरी निराशा पडत आहे. दरम्यान विषम संख्येमुळे मुलीचें प्रमाण घटल्याने मुलासाठी मुलगी मिळणे हा एक जिकिरीचा सवाल बनला आहे. मुली व मुलीच्या पित्यास मोठा भाव आला असुन यामुळे वर संशोधन करतानां मुलगा नौकरीस हवा. जमिन भरपुर असावी. गाडी बंगला असावा.मुलगा एकुलता असावा अशा विविध अटी मांडल्या जात असुन यामुळे अनेक लग्नाळु युवकाचीं लग्ने जमवतानां दमछाक होत आहे. हुंडा पद्धत जवळपास बंदच होत चालली असुन उलट वर पक्षच मुलीकडचाही खर्च उचलतानां दिसतो आहे.काही ठिकाणी तर वधु पक्षाचा खर्च उचलुन आणखी वधु पित्यासही पैसे दिले जात आहे.यात पुर्वी जमवाजमवीचे काम करणारे मध्यस्थ हे पुण्याचे काम म्हणत फुकट जुळवाजुळव करायचे.आता मध्यस्थ ही पैसे घेतल्याशिवाय पुढे पाऊल टाकत नाही अशी परिस्थिती आहे. आता वधु पिता जोमात तर वर पिता अक्षरश कोमात जात आहे. ठरवुन लग्न ही जिकिरीची बाब ठरत असल्याने प्रेम विवाहाकडे कल वाढतो आहे.बरेचसे तरुण तरुणी शाळा, कॉलेजमध्ये शिकत असतानांच शिक्षण व पुढील भविष्य याकडे दुर्लक्ष करत प्रेम प्रकरणे करुन घरातील लोकाचां पैसा व चिंता दोन्ही कमी करत आहे. यात कायदा ही त्यांचे बाजुने असल्याने या प्रकारच्या विवाहानां ऊत आला आहे तर तुलनेत ठरवुन केली जाणारी लग्नाचें प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. हल्ली जात पात ही गौण ठरत असुन कुणीही कुठल्याही जातीची वा पातीची मुलगी प्रेम प्रकरणाद्वारे वा ठरवुन , पैसे देऊन केल्या जात आहेत.
