
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८७२ वा दिवस स्वर्गातील ईश्वराची कल्पना म्हणजे काय आहे? जडवाद. अनंत ईश्वरी तत्त्व हे आपल्यापैकी प्रत्येकाच्या ठायी विद्यमान आहे. ही वेदान्ताची शिकवण आहे. तुम्ही जर ईश्वर असाल तर मीही ईश्वरच आहे. म्हणून वेदान्त मानवाला कदापि पापी मानीत नाही. वेदान्त चुका मानतो. पण पाप मानीत नाही आणि कालांतराने सर्व काही ठीक होणार आहे असे वेदान्त मानतो. वेदान्ताला सैतान ही कल्पनाच मुळी मान्य नाही. असले अर्थशून्य विचार जगात काही नाही. स्वतःला अगर दुसऱ्याला पापी किंवा क्षुद्र मानणे हे एकमेव पाप आहे असे वेदान्त मानतो. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर २० चैत्र शके १९४७*
★ चैत्र शुद्ध /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १० एप्रिल २०२५ ★ भगवान महावीर जयंती
★ १९६५ विदर्भात शिक्षण प्रसाराचे महत्वपूर्ण कार्य करणारे, स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा स्मृतीदिन★ १९८२ भारताचा पहिला उपग्रह “इन्सॅट वन” याचे अंतराळात यशस्वी उड्डाण.
★ २००० सुप्रसिध्द संस्कृत पंडित, विवेकानंद केंद्र प्रार्थनेचे रचेता डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर दादासाहेब यांचा स्मृतीदिन
.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*


