




सिन्नर प्रतिनिधी( सोमनाथ गिरी ):- इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील जनता विद्यालय व जुनिअर कॉलेज या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ७६ .२८ टक्के इतका लागला असून विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा या वर्षीही कायम राखल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मार्च -२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा मध्ये विद्यालयातील समृद्धी सचिन चव्हाण (९१. ६०) प्रथम, समीक्षा मल्हारी पंडित (८८.४०) द्वितीय , गणेश एकनाथ माळी (८७. २०) तृतीय, अदिती श्रीनिवास पोतदार (८६. ४०) चतुर्थ,, मानव विनोद चंद्रमोरे (८५ ) याने पाचवा क्रमांक मिळवत यश संपादन केले. विद्यालयातील २९१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते .त्यापैकी २२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.२० विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य तर ५१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळविली.८४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अँडव्होकेट नितीन ठाकरे, तालुका संचालक अँडव्होकेट संदीप भाऊ गुळवे , संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ.भास्करराव ढोके, शालेय समितीचे अध्यक्ष मनोज भाऊ जाधव ,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष राजेंद्र आप्पा जाधव , प्राचार्य नितीन भामरे ,उपमुख्याध्यापक उल्हास पवार,पर्यवेक्षक हिरामण चौधरी, मुख्य लिपिक भाऊसाहेब रणशेवरे, जेष्ठ शिक्षक चारूलता तागडे, सोमनाथ गिरी आदींसह शालेय समितीचे सदस्य, पालक शिक्षक संघ सदस्य, शिक्षक ,शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले आहे.
