
“सालाबाद प्रमाणे यावर्षीही बुधवार दिनांक ६ मे २०२६, रोजी ब्राह्मण सभा नाशिक रोड येथे, ज्ञाती बांधवांच्या मुलांचा सामूहिक व्रतबंध सोहळा मोठ्या उत्साहात, आणि कौटुंबिक वातावरणात संपन्न झाला.चिराग जोशी पनवेल, प्रांशु चंद्रात्रे पुणे, पार्थ प्रवीण जोशी चाळीसगाव, अद्वैत अमृतकर नाशिक, चैतन्य जोशी पिंपळगाव,प्रण्यम्य मोघे वरळी, योगीराज कुलकर्णी नाशिक, विष्णु शास्त्री नाशिक, लक्ष जोशी नाशिक या बटुंचा व्रतबंध सोहळा निलेश मुळे यांच्या प्रमुख पौरहित्याखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यांना विशाल शर्मा व शशांक क्षीरसागर गुरुजींनी मोलाची मदत केली. ब्राह्मण सभा नाशिक रोडच्या सभागृहात सदर सामूहिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन व व्यवस्थापन, अत्यंत आखीव आणि रेखीव असे कार्याध्यक्ष सुरेश कुलकर्णी यांनी केले. हा सोहळा यशस्वी होण्यासाठी विश्वस्त अनिल कुलकर्णी, सचिव मिलिंद ताथोडे, खजिनदार व्यवहारे, दिलीप भिंगारकर शिरीष कुलकर्णी, धर्माधिकारी, रविंद्र वैद्य, सारंग धरणगांवकर, मकरंद एकतारे, किरण हिंगणे, जयंत देशपांडे, अविनाश गोसावी, निलेश मुळे, महिला अध्यक्षा मंदाकिनी शेरीकर, दिपाली भिंगारकर,मंजूषा ताथोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.या याप्रसंगी उपस्थित ज्ञाती बांधवांनी संस्थेच्या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले व भविष्यातही असे उपक्रम आयोजित करावे अशा भावना व्यक्त केल्या. संस्थेच्या भव्य दिव्य बांधकामाचे काम प्रगती पथावर असल्याने, सदर बांधकामास देणगी रुपाने अनेकांनी सढळ हाताने मदत केली.कार्याध्यक्ष सुरेश कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
