.

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२६५ वा दिवस*
एखाद्या व्यक्तीने कोणत्याही पंथाविषयी, धर्ममताविषयी, अवताराविषयी व शास्त्राविषयी कधी काही ऐकले नसेल तरी काही हरकत नाही; पण तिला जर अशी प्रत्यक्ष अनुभवती लाभली असेल तर मग तिला आणखी कशाचीच आवश्यकता नाही. चित्त शुद्ध करा हेच आहे धर्माचे सार, यातच सगळा धर्म आला आणि आपण स्वतः जोपर्यंत आपल्या मनावरचे हे डाग दूर करीत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्या सत्याचे यथार्थ दर्शन घडणे शक्य नाही. तुमच्या स्वतःच्या आतमध्ये जे दोष आहे ते सारे दूर करा आणि मग तुम्हाला बाहेर कोणताही दोष दिसावयाचा नाही. एखाद्या चक्रव्यूहाच्या चित्रात लपलेली वस्तू एकदा तुम्हाला सापडली की ती सदाच दिसत राहील. तसेच तुम्ही एकदाचे मुक्त आणि निर्दोष होऊन गेलात की मग तुम्हाला भवतालच्या जगात मुक्ती आणि शुद्धता या खेरीज आणखी काहीच दिसावयाचे नाही. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास १९ शके १९४८*
★ वैशाख वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. ९ मे २०२६
★ १५४० मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्मदिन
★ १८१४ इंग्रजी व्याकरणकार, ग्रंथकार दाबोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्मदिन
★ १८६६ स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्मदिन
★ १९५९ रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन.*
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*आहे
