
मखमलाबाद ( वार्ताहर ) — मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री. छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबादच्या इयत्ता १०वीचा निकाल आज ८ मे २०२६ रोजी ऑनलाइन जाहीर झाला.या विद्यालयाने १०वीच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवत ९७% निकाल लागला. एकूण परीक्षेत ५३५ विद्यार्थी प्रविष्ट होते पैकी ५१९ विद्यार्थी पास झाले. विशेष प्राविण्यश्रेणीत २२३ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १६७ विद्यार्थी तर पासग्रेडचे २६ विद्यार्थी पास झाले. कु. यथार्थ दीनानाथ खैरनार ९३% व कु.रोशनी सुनील गांगुर्डे हिने ९३% असे सारखे गुण मिळवून दोघांनीही प्रथम क्रमांक पटकावला.कु. उत्कर्षा कैलास बांगर हिने ९२.४०% मार्क मिळून दुसरा क्रमांक पटकावला. तर राधिका ज्ञानेश्वर सुरडकर हिने ९२.२०% गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. कु.अथर्व देशमुख ९१.८०%, कु.सार्थक परभणे ९१.८०%, कु.आकांक्षा कोलते ९१.८०%, कु. ज्ञानराज पवार ९१.८० %यांनी चौथा क्रमांक पटकावला, व कु.कृष्णा बर्वे याने ९१.६०% गुण मिळवून पाचवा पटकावला *या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्रचे नाशिक ग्रामीणचे संचालक तथा माध्यमिक शाळेत समिती अध्यक्ष मा.श्री.रमेश आबा पिंगळे,माननीय नगरसेवक श्री. वाळु आप्पा काकड, मा.सौ.रोहिणीताई पिंगळे, मा.सौ.चित्राताई तांदळे, मा.श्री. प्रमोदजी पालवे,तसेच माध्यमिक शालेय समिती सदस्य, उच्च माध्यमिक शालेय समिती, सीनियर कॉलेज व्यवस्थापन समिती , अभिनव बाल विकास मंदिर ,होरायझन व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व सदस्य,सभासद , शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य, माता पालक संघाचे अध्यक्ष व सदस्य,ग्रंथ मित्र रामचंद्र काकड वाचनालयाचे अध्यक्ष व सदस्य विविध विकास सहकारी सोसायटीचे अध्यक्ष व सदस्य, विशाखा समितीचे अध्यक्ष व सदस्य,महिला तक्रार समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य व पालक तसेच मा.प्राचार्य श्री.संजय डेर्ले , उपप्राचार्य श्री. सुरेश भदाणे, पर्यवेक्षक श्री. संजय हांडगे व ज्युनिअर कॉलेज प्रमुख प्रा.विकास थोरात, ९७% घवघवीत निकाल राखण्यासाठी इयत्ता १० वीचे सर्व वर्ग शिक्षक, सर्व विषय शिक्षक, इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. केंद्र संचालक म्हणून मा.पर्यवेक्षक श्री.संजय हांडगे सर ,उपकेंद्र संचालक म्हणून श्री. अशोक गावले सर श्री. दयाराम मुठाळ यांनी यशस्वी कामकाज पाहीले.तसेच कस्टोडीयन म्हणून श्री. अनिल पगार सर यांनी काम पाहिले.*मा. प्राचार्य सो,श्री. संजय निवृत्ती डेर्ले श्री. छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद.
