
ओझर:( वार्ताहर )येथील ‘मविप्र’ संचलित सहकार महर्षी माधवराव बोरस्ते विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल 87.97% लागला.परीक्षेस 366 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी 322 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. विशेष श्रेणीत ७६, प्रथम श्रेणी१२६, द्वितीय श्रेणी ८९, उत्तीर्ण ३१ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात विद्यालयात प्रथम यशस्वी विद्यार्थीनी कु वैभवी ज्ञानेश घुमरे 96.20%, . कु अनुष्का अरविंद मोरे 93.80%, कु पूर्वा संतोष आव्हाड 93.60%, कु ऋतुजा रवींद्र बोरसे ,93.40%, कु वैष्णवी भास्कर गायकवाड 92.60% गुण मिळवून उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ सुनील ढिकले सभापती बाळासाहेब क्षिरसागर उपाध्यक्ष विश्वासराव मोरे उपसभापती डी बी मोगल संचालक शिवाजी गडाख महिला संचालिका शोभाताई बोरस्ते शालेय समिती अध्यक्ष भास्करराव शिंदे व सदस्य मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
