
साकोरे 🙁 प्रतिनिधी )पेडकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्था साकोरे संचलित माध्यमिक विद्यालय साकोरेने फेब्रुवारी-मार्च २०२६ एस.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटवली.यावर्षी विद्यालयातील ७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.परीक्षेत गौरव सोमनाथ पगारे याने ९०.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. शर्वरी श्रीराम बोरसे हिने ८४.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर भूमिका दत्तू बोरसे हिने ७९.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, शालेय व्यवस्थापन समिती, स्कूल कमिटी, माजी विद्यार्थी संघ, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
