
वसंत नगर ( प्रतिनिधी ) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च – 2026 चा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित श्री साई ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालय वसंतनगर ता.नांदगाव शाळेचा निकाल 98% इतका लागला विद्यालयातून एकूण 50 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी 49 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यात 19 विद्यार्थी विशेष प्रावीण्य* श्रेणीत , 23 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 07 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत* यश संपादन करण्यात यशस्वी झालेत. आपल्या शाळेची “यशस्वी निकालाची परंपरा” यंदाही कायम राखत विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.हे यश विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचे फलित आहे.**सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा*!*असेच यश संपादन करून शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल करा. संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री एस. जी. राठोड साहेब , सचिव श्री सिद्धांत दादा राठोड व संचालक मंडळ तसेच मार्गदर्शक श्री जे. जी.राठोड साहेब* यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गुणानुक्रम विद्यार्थ्यांचे नाव शेकडा गुण
1 महेंद्र अशोक लाठे 86%*
2 युवराज भरत चव्हाण 85.80%*
3 स्वाती ज्ञानेश्वर पवार 84.20%*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील अभिनंदन केले.
