
नाशिकरोड 🙁 प्रतिनिधी)- पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील नासाका माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. ओम भाऊसाहेब रोकडे हा विद्यार्थी ९० टक्के गुण मिळवून सेमी इंग्रजी माध्यमात प्रथम आला आहे. सेमी इंग्रजी माध्यमात द्वितीय-ओम विनायक जाधव-८७.८० टक्के, तृतीय-वैष्णवी ज्ञानेश्वर आडके-८७.६० टक्के, चतुर्थ-कार्तिकी शिवाजी गायधनी-८६.६० टक्के, पाचवा-मानसी शांताराम टिळे-८५.२० टक्के असे क्रमांक प्राप्त केले आहेत. तर मराठी माध्यमात प्रथम-आविष्कार विलास घुगे-८३.०० टक्के, द्वितीय-आर्यन सूर्यभान सानप-८०.४० टक्के, तृतीय-सार्थक किरण घुगे-७५.४० टक्के, चतुर्थ-वैष्णवी कैलास सानप-६९.२० टक्के, पाचवा-भाग्यश्री संदीप मुठाळ-६८.४० टक्के असे क्रमांक प्राप्त केले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, कार्यकारी संचालक सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक अरुण पगार, शिक्षक-कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
