
नांदगाव, ( प्रतिनिधी): नांदगाव येथील श्री. माणिकचंद जगन्नाथ कासलीवाल एज्यूकेशन ट्रस्टच्या सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालयाचा दहावी परीक्षेचा 100 टक्के निकाल लागला असून दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील अथर्व धनराज महाजन 98.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर राजनंदिनी गजानन कुकडे हिने 96 टक्के गुण मिळवून द्वितीय तर तृतीय क्रमांक साई वैभव घोटेकर 94 टक्के गुण प्राप्त केले.शुभम योगेश महाजन 89 टक्के गुण मिळवून चतुर्थ तर तनुजा योगेश पाटील हिने 88.20 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक प्राप्त केला. संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल ,तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा,सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल,गुप्ता सर, प्रिन्सिपल मनी चावला विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ,विशाल सावंत तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
