
नांदगाव:( प्रतिनिधी)–महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता १० वीच्या निकालात, मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) संचलित न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव या विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९१.८० टक्के लागला असून, यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
एकूण निकाल: –९१.८०%
पहिले पाच विद्यार्थी:—
-१) वेदिका जाधव – ९६.४०%
२) गौरी सोनवणे – ९१.८०%
३) स्वरा गायकवाड – ९१.००%
४) संचिता करवर – ९०.००%
५) अनुष्का जाधव – ८९.८० %
अनेक विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी (Distinction) आणि प्रथम श्रेणीमध्ये यश संपादन केले आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून गुणवत्तेतही मुलींनी आघाडी घेतली आहे.निकाल जाहीर होताच उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकांनी विद्यालयात जल्लोष केला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य या त्रिसूत्रीमुळेच हे यश साध्य झाले आहे.” मविप्र संस्थेचे पदाधिकारी, तालुका संचालक इंजि अमित भाऊ बोरसे-पाटील,स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय काकळीज, आणि मुख्याध्यापिका ज्योती काळे उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
