
पोखरी ( प्रतिनिधी): माऊली माध्यमिक विद्यालय, पोखरी येथील इयत्ता दहावीचा मार्च २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाने ७०.३७ टक्के निकालाची नोंद केली आहे. विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
यंदाच्या परीक्षेत कमलेश राजेंद्र बागुल याने ७५.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. पवन भारत राऊत याने ७२.०० टक्के गुणांसह द्वितीय, तर नितेश मनोहर बागुल याने ७०.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच श्रद्धा अविनाश ढोकरे हिने ६६.६० टक्के गुणांसह चौथा क्रमांक, तर कैलास सुभाष भोई याने ६५.८० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचे कठोर परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याची भावना विद्यालयाच्या शिक्षक वृंदाकडून व्यक्त करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
