
नाशिक (वार्ताहर) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील न्यू मराठा हायस्कूलने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात न्यू मराठा हायस्कूलचा निकाल ९९.६५% टक्के लागला आहे. न्यू मराठा हायस्कूल मध्ये एस. एस. सी परीक्षेसाठी एकूण२९३ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते
९०%च्या पुढे विद्यार्थी=२७ विशेष प्राविण्यात उत्तीर्ण=१८७* प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण=८५ द्वितीय श्रेणी विद्यार्थी=१८
प्रथम पाच विद्यार्थी
१)कु.प्रणाली स्वामीनाथ कुंभार ९७.६०%
२)कु.ओजस्वीनी भास्कर जाधव ९७.४०%
३)कु.जान्हवी अविनाश देसले ९६.८०%
४)कु.साक्षी ज्ञानेश्वर खरात ९५.८०%
५)कु.प्रांजल पंकज ९५.२०%
या सर्व विद्यार्थ्यांनी गुण मिळवून विद्यालयात विशेष यश संपादन केले.या विद्यार्थ्यांचे मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनिल उत्तमराव ढिकले ,उपाध्यक्ष विश्वास बापूराव मोरे ,मा.सरचिटणीस अँड. नितीन बाबुराव ठाकरे ,सभापती श्री बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर,उपसभापती देवराम बाबुराव मोगल,चिटणीस दिलीप सखाराम दळवी नाशिक शहर संचालक अँड.लक्ष्मण फकिरा लांडगे,नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश पांडुरंग पिंगळे व सर्व संचालक मंडळ,मविप्र समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी डाॅ.भास्कर ढोके , शालेय समिती अध्यक्ष व सर्व सदस्य ,विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी,पालक यांनी अभिनंदन केल.
