
मूळडोंगरी ( प्रतिनिधी)येथील संत सेवालाल महाराज संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी ,येथील ए विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्याSSC बोर्ड परीक्षेचा निकाल 97.95% लागला विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विद्यालयाचा निकाल अत्यंत समाधानकारक लागला असून अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.
1) प्रथम क्रमांक-मोरे अमृता शांताराम -90 20%
2) द्वितीय क्रमांक आव्हाड रूपाली रवींद्र -88.60%
3) तृतीय क्रमांक- पवार दिपाली बाजीराव -87%
4) चतुर्थ क्रमांक* – चव्हाण सागर धनराज 85.20%
5) पाचवा क्रमांक* -चव्हाण करण समाधान 83.20% यावेळी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष माननीय एस.जी. राठोड साहेब, संस्थेचे आधारस्तंभ मा.जे जी राठोड साहेब,सचिव श्री सिद्धांत दादा राठोड, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका , शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य लाभल्यामुळे विद्यार्थ्यांनीहे यशाचे शिखर गाठले आहे . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
