
तळोदा( मंगेश पाटील ) नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांची राज्यस्तर समिती अध्यक्षपदी निवड आदिवासी भागात आरोग्य सेवा बळकटीकरण साठी समितीची नियुक्ती आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यांनी समितीच्या कामकाजावर होणार चर्चा राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्य विषयक समस्यांच्या सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपयोजना राबविण्यासाठी राज्यस्तरीय अंमलबजावणी साठी समितीचे गठन करण्यात आले आहे या समितीच्या अध्यक्षपदी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही समिती पुढील तीन वर्षासाठी कार्यरत राहणार आहे या समितीच्या सदस्यपदी जळगाव गडचिरोली गोंदिया आणि नांदेड जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समावेश करण्यात आला आहे नाशिक मंडळाचे उपसंचालक आरोग्यसेवा डॉक्टर कपिल आहेर हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत ही समिती राज्यातील सर्व 16 आदिवासी बहुल जिल्ह्यासाठी कार्य करणार आहे आरोग्य सेवा ;पोषण; सिकलसेल नियंत्रण; मनुष्यबळ उपलब्धता ; आंतरविभागीय समन्वय यासारख्या विषयावर प्राधान्यक्रम निश्चित करून अंमलबजावणी प्रक्रियेच्या नियमित आढावा घेणार आहे
