
नाशिक ( प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत असणाऱ्या उच्च माध्यमिक विभागाचा निकाल घोषित झाला असून नासिक येथील यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा शाखा निहाय निकाल कला -८४.५५ %वाणिज्य – ८१.९६ %विज्ञान -९५.५२ %
कला शाखा –
प्रथम कु.रवीना संजय बहिरम (७९.८३ %)
द्वितीय -कु.अनिता दिनकर पालवे (७४.३३ %)
तृतीय -कु.रवीना गंगाधर गायकवाड (७३.३३ %)
वाणिज्य शाखा
प्रथम- कु.कावेरी रमेश घुगे (७१.५० %)
द्वितीय -कु.पूनम गवळीराम काळे ( ७२.३३ % )
तृतीय -कु.अक्षरा गजानन रघोजीराव (६५.१७ %)
विज्ञान शाखा
प्रथम कु.तेजश्री भीमराज उपाध्ये (७०%)
द्वितीय कु.श्रेया भास्कर गवळी (६६.१७ %)
तृतीय कु. खुशी शशिकांत ओतारी (६१.८३ %)
याप्रमाणे लागला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन ,उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष रमेश महाशब्दे , सेक्रेटरी हेमंत बरकले ,ग.कौ.सदस्य भारती चंद्रात्रे, कैलास बागुल व सर्व संस्था व शाळा पदाधिकारी यांनी सर्व विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे या निकालासाठी मुख्याध्यापिका सुनिता बाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक मिलिंद कोठावदे उपमुख्याध्यापिका शगुफ्ता शेख व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
