
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२६२ वा दिवस
भारतीय शिक्षणाची कोणतीही समस्या सोडवण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे शिक्षकाच्या दैनिक सामान्य कार्याचा अनुभव आणि यासाठी एक सगळ्यात मोठा आणि अत्यंत आवश्यक गुण शिक्षकाच्या अंगी असणे जरुरीचे आहे. तो म्हणजे शिष्याच्या दृष्टीतून जगाकडे पाहण्याची शक्ती. शिक्षणशास्त्राच्या प्रत्येक सिद्धांतातून हेच सत्य प्रतिपादित केले गेले आहे. शिष्याच्या आकांक्षांचा विरोधी शिक्षण देणे म्हणजे यशाऐवजी अपयशच पदरी घेणे होय.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास १६ शके १९४८
★ वैशाख वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. ६ मे २०२६
★ १८५६ ऑस्ट्रेलियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिंग्मड फ्राॅईड यांचा जन्मदिन.
★ १८६१ प्रख्यात कायदेपंडित, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक मोतीलाल गंगाधर नेहरु यांचा जन्मदिन.
★ १९२२ सामाजिक आरक्षणाचे जनक, कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतिदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
