
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२६१ वा दिवस
भगवंत आणि त्याच्यावरची तुमची भक्ती या दोघांच्यामध्ये काहीही आड येऊ देऊ नका. भगवंताकडे जाण्याला अडथळा करील अशा कशाला देखील कदापी थारा देऊ नका. भगवंतावर भक्ती करा. त्यांच्यावर प्रेम करा, जगातील लोक काय वाटेल ते म्हणोत त्याकडे दुर्लक्ष करा. भक्त तीन प्रकारचे असतात. समर्था, समंजसा आणि साधरणी. साधारणी भक्त असलेली व्यक्ती आपल्या प्रेमास्पदाजवळ केवळ हे द्या, ते द्या असे सारखे मागत असते. स्वतः मात्र काहीच देत नसते. समंजसा भक्तीत विनिमयाचा वा देवाण-घेवाणीचा भाव असतो. समर्था भक्ती असलेला भक्त मात्र परत कशाचीही अशा-आकांक्षा, इच्छा न धरता केवळ प्रेमाकरता निःस्वार्थ प्रेम करीत असतो. जसे दीपमाळावरचे पतंगाचे प्रेम. जळून मरेल पण प्रेम करावयाचे सोडणार नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास १५ शके १९४८
★ वैशाख वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. ५ मे २०२६
★ अंगारकी (मंगळी) संकष्ट चतुर्थी
★ १८१८ साम्यवादाचे प्रणेते, जर्मन तत्वज्ञ कार्ल मार्क्स यांचा जन्मदिन.
★ १८२१ असामान्य सेनापती, कर्तबगार प्रशासक, जगज्जेता, फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट याचा स्मृतीदिन.
★ १९१६ भारताचे ७ वे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचा जन्मदिन.
★ १९१८ बालकवी तथा निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा स्मृतीदिन
★ जागतिक व्यंगचित्रकार दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
