
वेणुबाई पुंजाराम डोंगरे चेअरमन पदी निवड तर व्हाईसचेअरमन पदी श्रावण गोधडे यांची निवड करण्यात आली
नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव विधानसभेचे आमदार मा. सुहास अण्णा कांदे व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनानुसार वेहेळगाव वि. वि.कार्यकारी सोसायटी च्या *चेअरमन व व्हाइस* चेअरमन पदाची निवड बिन विरोध व्हावी यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात येऊन 5-5 महिने सर्व संचालकांना चेअरमन पदाची संधी मिळावी व 5 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण होताच राजीनामा देऊन पुढच्या संचालकास चेअरमन पदी संधी देण्याचे ठरले व त्यानुसार गुलाबभाऊ भाबड,दादा चकोर, ॲड.दराडे,मधुकर गीते,हनुमान गीते, सर्जेराव भाबड,राजेंद्र बोडके,अशोक गीते आदी प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने चेअरमन पदाच्या चिठ्ठ्या काढण्यात येऊन खालील क्रमाने *चेअरमन* निवड करण्यात आली व श्रावण गोधडे यांची व्हाइस चेअरमन पदी निवड करण्यात आली.*1) वेनुबाई पुंजाराम डोंगरे**२) ॲड.सुरेश रामभाऊ आव्हाड*३)रोहित सुपडू चांदवडे४)बाळू लुकडू काकड५)संतोष महादू गीते६)बाळू गोविंद बोडके७)मधुकर रामभाऊ डोंगरे८)सुलोचना भागवत दर्गुडे ९)गोकुळ महादू सांगळे१०)नीलकंठ मुरलीधर सानप११)पोपट मांगु सानप
