खेळाडूंची रजिस्ट्रेशन फीबाबत राज्य मंडळाशी बोलून निर्णय घेण्यात येईल डॉ. मच्छिंद्र कदम यांचे आश्वासन..

नाशिक ( प्रतिनिधी )नाशिक जिल्हा क्रीडा शिक्षक संघटने च्या वतीने क्रीडा शिक्षक यांच्या करिता उद्बोधन शिबिराचे आयोजन जु.स. रुंग्ठा हायस्कूल अशोकस्तंभ येथे करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील व शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ. मच्छिंद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी डॉ. कदम बोलत होते.सदर शिबिरास नाशिक जिल्ह्यातून २७३ क्रीडा शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते, या शिबिराचे आयोजन नाशिक जिल्हा क्रीडा शिक्षक संघटना यांनी केले होते. विविध क्रीडा विभागाच्या योजना बाबतचे मार्गदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक श्रीमती सुनंदा पाटील मॅडम, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अविनाश टिळे यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाबली हनुमानाच्या पूजनाने करण्यात आली.

यावेळी शिर्डी येथे दिनांक १२ ते १४ एप्रिल २०२५ रोजी क्रीडा शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होत असून त्याचे आयोजक नाशिक जिल्हा क्रीडा शिक्षक संघटना आहे. सदर अधिवेशनात जास्तीत जास्त क्रीडा शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक संजय पाटील यांनी केले. क्रीडा शिक्षकांची भूमिका, राज्याचे सदोष क्रीडा धोरण व क्रीडा शिक्षकांची पद निर्मिती यासाठी संघर्ष उभा करण्याबाबत क्रीडाशिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.संजय चव्हाण यांनी सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनींना आवाहन केले. या शिबिरामध्ये प्रथम सत्रात क्रीडा शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापना बद्दल माहिती प्रा.डॉ.योगेंद्र पाटील यांनी दिली. तसेच विविध शासनाच्या योजनांची माहिती तालुका क्रीडा अधिकारी श्री.महेश पाटील सर व भाऊसाहेब जाधव सर यांनी दिली. या कार्यक्रमाप्रसंगी विविध तालुक्याचे क्रीडा प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला .तसेच नाशिक विभाग आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार संजय चव्हाण सर , क्रीडा शिक्षक पुरस्कार किशोर राजगुरू ,आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार संदीप भगरे, नवीन शैक्षणिक धोरण अभ्यासक्रम कमिटीकरिता निवड झालेले अमोल जोशी व वैभव खवळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जोशी यांनी केले व आभार प्रदर्शन किशोर राजगुरू यांनी मानले, या प्रसंगी, राजेंद्र सोमवंशी, चंद्रकांत पठाडे,पैलवान प्रवीण पाळदे , तेलोरे. अनिल ढोकणे, हेमंत पाटील , मधुकर वाघ. कैलास आरोटे विजय सोनवणे ,राठोड, पुनीत आवटे. राजेंद्र बच्छाव येवला तालुकाप्रमुख उंडे. खंडू भोये. मालेगाव तालुका प्रमुख जावेद अन्सारी. चिन्मय देशपांडे , संजय मगर,पवन खोडे, सतीश कांबळे, संतोष लहामगे, भरत खत्री, प्रणव अहिरे, कीर्ती गायकवाड,अनेक क्रीडा शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
