
नाशिक (प्रतिनिधी ]गिरणा गौरव प्रतिष्ठान, व अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन संस्थापक अध्यक्ष, मा. श्री सुरेश पवार म्हणंजे गावकुसाच्या काळ्या कसदार मातीच्या भूमीतून, हिरव्या शालूच्या पिकासोबत बहुरंगी साहित्याचे बहारदार रंजन मनोरंजन , प्रबोधन , भजन पूजन , प्रवचन, पथनाट्य ते नाटक , गवळण ते लावणी , किर्तन ते तमाशा ! लोकरंजनातून लोकशिक्षण व मनोरंजनातून समाज प्रबोधन … . एक ना अनेक विषय अनेक क्षेत्रातील विविध कलाव्यासंगी माणसांच्या गोतावळ्यात राहून, विविध उपक्रमाचे उदंड पिक घेणारे, चतुरस्त्र व्यक्तिमत्व ! त्यांची ओळख सांगायची झालीच तर गिरणा काठचा एक ध्येयवेडा ! श्री सुरेश पुणाजी पवार ! अभोणेकर ह. मु. नाशिक. आज ते त्यांच्या व्यस्त कामातून वेळात वेळ काढून, गावगाडाकार तात्यासो. श्री साहेबराव नंदन यांच्या नाशिक येथील निवासस्थानी जाऊन दिर्घ शुभेच्छा भेट घेतली. सुरेश पवारांचे प्रथमताच तात्यांकडे येणे झाल्याने त्यांचे आचित्यपूर्ण स्वागत तात्यांनी केले. या भेटीत गावकुसाच्या चावडीवरील ग्रामिण गप्पा टप्पा चांगल्याच रंगल्याचे साहेबराव तात्यांनी सांगितले. साहेबराव तात्यांच्या गावगाडा काव्य संग्रह, व परिसस्पर्श कादंबरीवर खुमासदार चर्चा झाली. जाता त्यांना सगर साहित्याची अनमोल भेट दिली. सुरेश पवारांनी देखील त्यांचा जागर साहित्यिकांचा व गिरणा गौरव पुरस्कार्थींची परिचय पुस्तिका भेट दिली. एकभेट ग्रेट भेट ! गोदाकाठी सदिच्छा भेट !
