
मालेगाव ता.(प्रतिनिधी)आयुष्य सुंदर आहे त्यासाठी माणुसपणाची भावना जोपासली पाहिजे हेच सुंदर जगण्याचे संचित आहे असे प्रतिपादन गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी केले. कै. पुरुषोत्तम फुलाजी ठाकूर गुरुजी स्मृति प्रित्यार्थ ज्येष्ठ नागरिक संघ मालेगाव यांच्या वतीने आयोजित अक्षर व्याख्यान मालेत दुसरे पुष्प गुंफतांना सुरेश पवार बोलत होते. माणसातला संवाद आज हरवत चालला आहे. म्हणून माणुस माणसापासून दुर होत आहे. जो पर्यंत आपल्यात माणुसपणाची संवेदना निर्माण होत नाही तो पर्यंत माणुस माणसाजवळ येणार नाही आणि माणुस समजुन घेतल्या शिवाय माणुसपण कळणार नाही. भौतिक सुखाची पाठराखण करत माणुस सुख शोधतोय पण घड्याळाचे काटे कोणासाठी थांबत नाही तसे मुठीतुन वाळू सरकावी तसे आयुष्य निघून चालले आहे. त्यासाठी दुखाने भरलेले आयुष्य सुंदर करण्यासाठी सकारात्मक विचाराची पेरणी करणारी चागंली पुस्तकं आणि चागंली माणसं वाचली पाहिजे. हा मंत्र जपला तर निश्चितपणे जीवन सुंदर होईल. जेष्ठ नागरीक संघाचे सदस्य या वेळी उपस्थित होते. निंबा निकम यांनी प्रास्ताविक केले तर नायब तहसीलदार जगदीश निकम यांनी आभार मानले.प्रकाशभाऊ कांकरिया, धर्मराज देवरे, नाना देवरे, नाना इंगळे, पी.डी. जाधव, के. आर. देवरे,जगदीश निकम, कृष्णराव भुसे, रेखाताई पवार, बबनराव भुसे, उखा मोरे, प्रभाकर वारुळे, ललिता शर्मा, शकुंतला गवांदे, भारती मुंदडा, देवसिंग साळुंखे, उत्तम गांगुर्डे, दिनकर हिरे, प्रमोद चव्हाण, भगवान बागुल, विजया माळी, बळवंत हिरे, बाळकृष्ण हिरे, बाळकृष्ण निकम, गोपीनाथ सूर्यवंशी, उखा मोरे,शांता कांकरिया, डॉ. अशोक पवार, संजय निकम,यांनी संयोजन केले.
