
कवयत्री प्रतिभा सुरेश खैरनार
नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव येथील कवयित्री प्रतिभा सुरेश खैरनार यांच्या “वंशावळीच्या प्राचीन सरीतून” या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाला आहे. येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती पाचव्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे निकाल दि. १ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आले.कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आलेल्या या निकालात कविता संग्रह या प्रकारात कवयित्री प्रतिभा सुरेश खैरनार यांच्या “वंशावळीच्या प्राचीन सरीतून” या काव्यसंग्रहाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण दि. ४ जून २०२६ रोजी पिंपळगाव जलाल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी दिली.या यशाबद्दल कवयित्री प्रतिभा खैरनार यांनी आनंद व्यक्त केला असून या पुरस्कारामुळे त्यांच्या काव्यसंग्रहाला आणखी एक मानाचा सन्मान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, या उल्लेखनीय यशाबद्दल प्रा. सुरेश नारायणे, गझलकार काशिनाथ गवळी,ॳॅड.सचिन साळवे, किरण मोरे,तसेच विद्या देवरे( माळी) मॅडम आदींनी कवयित्री प्रतिभा खैरनार यांचे अभिनंदन केले आहे.
