
नाशिक ( प्रतिनिधी )१ मे, महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सुखम् फिजिओथेरपी अँड रिहॅब या क्लिनिकचे उद्घाटन नाशिक मधील ख्यातनाम अस्थीरोग तज्ज्ञ डॉ विजय काकातकर आणि डॉ भरत केळकर यांच्या हस्ते आणि डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ राजेश वाळवेकर, डॉ मनोज शिंपी तसेच सर्वश्री विश्वास ठाकूर, डी जे हंसवानी, गोपाळराव पाटील, रतन लथ, शर्वरी लथ, शेफाली भुजबळ या मान्यवरांच्या उपास्थितीत झाले. या उद्घाटन प्रसंगी नाशिक मधील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सुखम् ला आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.सुखम् हे अनेक अद्यावत उपकारणांनी सुसज्ज असलेलं एक फिजिओथेरपी अँड रिहॅब सेंटर हे नाशिक येथील गंगापूर रोड, आकाशवाणी टॉवर शेजारील एम स्वेअर या व्यावसायिक इमारतीत असून रुग्णांना त्वरित आराम मिळण्याच्या दृष्टीने परिपूर्ण असे क्लिनिक असल्याचे सुखम् च्या संचालिका डॉ. दिशा विराज रानडे (PT) यांनी सांगितले. डॉ दिशा, ग्रंथ तुमच्या दारी आणि अष्टौप्रहर स्वरहोत्र या योजनेचे चे संकल्पक विनायक रानडे यांच्या स्नुषा आहेत.
