.

*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२५९ वा दिवस* ज्ञान नित्य विद्यमान आहे. ईश्वराबरोबरच तेही अनादी काळापासून अस्तित्वात आहे. आणि अनंतकालापर्यंत अस्तित्वात राहील. जोवर ईश्वर आहे तोवर ज्ञानही आहेच. जी व्यक्ती एखाद्या अध्यात्मिक सत्याचा व अध्यात्मिक नियमांचा शोध लावते तिला Inspired वा दैवी स्फूर्ती लाभलेली व्यक्ती वा ऋषी म्हणतात. ती जे काही प्रकाशात आणते त्याला Revelation किंवा अपौरुषेय उक्ती म्हणतात. परंतु या असल्या अपौरुषेय उक्तीही अनंत आहेत. त्या काही संपल्या नाहीत. समस्त ज्ञानाची समष्टी वा गोळाबेरीज ही नेहमी समानच असते. फक्त ती कधी जास्त तर कधी कमी अभिव्यक्त होते, इतकेच. ह्या ज्ञानाचा एकमेव उगम आपल्या आतच आहे, आणि फक्त तेथेच हे ज्ञान लाभू शकते.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास १३ शके १९४८*
★ वैशाख वद्य /कृष्ण २
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. ३ मे २०२६
★ १८९८ मराठी चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा जन्मदिन.
★ १९१३ चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके दिग्दर्शित “राजा हरिश्चंद्र” भारतातील पहिला मुक चित्रपट प्रदर्शित होऊन भारतीय चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
★ पत्रकारिता अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिन.
