
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता १२ वीचा विज्ञान शाखेचा निकाल ९९-४७ टक्के तर कला शाखेचा निकाल ९६-३५ टक्के लागला असून १९१ प्रविष्ट पैकी १९० विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहे. विज्ञान शाखा : प्रथम – समिक्षा राजनोर (८४.८३) द्वितीय – जयश्री ढोणे (८४.५०) तर कला शाखेचे १३७ प्रविष्ट पैकी १३२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कला शाखा : प्रथम – आकांक्षा अहिरे (७९.१७) द्वितीय – नम्रता दुकळे (७५.००) तृतीय समृध्दी खैरे (७३.५०) आकांक्षा अहिरे या विद्यार्थिनीने राज्यशास्त्र विषयात सर्वाधिक ९३ गुण पटकावलेत. तर चार विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र विषयात सर्वाधिक प्रत्येकी ९१ गुण मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासुताई रोडूआण्णा पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक विश्वस्त, पदाधिकारी, प्राचार्य पी. जी. माने पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारींसह ग्रामस्थांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी सुशय चिंतले.
