
लासलगाव (ता. निफाड, जि. नाशिक)लासलगाव महाविद्यालयाचा बारावी निकाल ९७.६६ टक्केफेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या बारावी (HSC) परीक्षेत नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगावचा निकाल ९७.६७ टक्के लागला आहे. एकूण ५५९ विद्यार्थ्यांपैकी ५४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाने यंदाही उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखली आहे. वाणिज्य शाखेतील कु.प्रज्ञा कैलास राऊत आणि रिया गोरख घनघाव या दोन्ही विद्यार्थिनींनी अकाउंटन्सी विषयात शंभर पैकी 100 गुण मिळवत विशेष प्राविण्य प्राप्त केले.शाखानिहाय निकालविज्ञान शाखा : १००% (१२० पैकी १२० उत्तीर्ण)वाणिज्य शाखा : १००% (२३७ पैकी २३७ उत्तीर्ण)कला शाखा : ९३.५६% (२०२ पैकी १८९ उत्तीर्ण)शाखानिहाय गुणवंत विद्यार्थी🔹 विज्ञान शाखा1. जोया अनिस नाईकवाडी ५२४ (८७.३३%)2. कांचन नानासाहेब जगताप५१६ (८६.००%)3. सपना सुरेश जगताप ४९५(८२.५०%)🔹 वाणिज्य शाखा1. रोशनी गणेश कटारे ५३९ (८९.८३%)1. प्रज्ञा कैलास राऊत५३९ (८९.८३%)2. सोनल सोमनाथ घोटेकर ५१३ (८५.५०%)3. रिया गोरख घनघाव ५११ (८५.१७%)🔹 कला शाखा1. मोनाली दत्तात्रय ठोके ४८६(८१.००%)2. अभिषेक गोरख बुल्हे ४६३(७७.१७%)3. कीर्ती रामकृष्ण बढे ४३८(७३.००%)यशस्वी विद्यार्थ्यांचे नूतन विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन मा. श्री. प्रकाश पाटील, जनरल सेक्रेटरी मा. श्री. गोविंदराव होळकर, खजिनदार मा. श्री. अनिल डागा, मॅनेजिंग बोर्डाचे सर्व सन्माननीय सदस्य व इतर पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा. भूषण हिरे, डॉ. सोमनाथ आरोटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. उज्वल शेलार, परीक्षा विभाग प्रमुख श्री. किशोर गोसावी, कार्यालय अधिक्षक श्री. रविंद्र होळकर तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
