
नांदगाव( प्रतिनिधी )कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगावचा एच.एस.सी. परीक्षा फेब्रु./मार्च 2026 चा निकाल 96.40% लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक मा. इंजि.अमितभाऊ बोरसे पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील यांनी हार्दिक अभिनंदन केले.
विभाग निहाय निकाल पुढीलप्रमाणे-
*विज्ञान शाखेचा निकाल 98.32%* लागला असून प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत-1) मनस्वी कैलास भिवगजे 77.17%2) दिव्या भरत काकळीज 77.00%3) श्रावणी कैलास चौधरी 76.83%*
वाणिज्य शाखेचा निकाल-96.55%* लागला असून प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत-1) कुणाल वाल्मीक चव्हाण 81.83%2) आदिती ज्ञानेश्वर आहेर 81.00%3) अपूर्वा गिरीश मांडवडे- 80.00%*
कला शाखेचा निकाल-94.35%* लागला असून प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत-1) अंकुश यादव देवकाते 73.17%2) साक्षी शिवाजी सरोदे 72.83%3)योगिता संजय बोरसे 72.00%महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
