
निफाड (प्रतिनिधी).निफाड येथील निफाड इंग्लिश स्कूल निफाड या शाळेत १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन करण्यात आले ध्वजवंदन शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र बाळासाहेब सोमवंशी यांचे शुभहस्ते करण्यात आले,

यावेळी शाळेचे चेअरमन अँड. प्रवीण ठाकरे , संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व सरस्वती विद्यालय व बाल मुक्तांगणचे चेअरमन नंदलाल चोरडिया, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सुरेंद्र पगारे होते.यावेळी शिक्षक श्री.महेंद्र जगताप, श्री.दत्तात्रय बैरागी, ,श्री.प्रमोद झुरडे, श्री .वाल्मिक पाटेकर, श्रीमती सिमा चौधरी, श्रीमती.गितांजली साबळे,श्रीमती.निर्मला झिरवाळ, श्री.रविंद्र लिलके , श्री.ओमप्रकाश जाधव श्री.विनय खोतकर,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.करूणा शेवरे यांनी केले.

तर आभार प्रदर्शन सौ.ज्योती कुमावत यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
