
सिन्नर ( प्रतिनिधी)२ मे २०२६ सिन्नर शहरातील तहसील कार्यालया समोरील क्रांतिस्थळावरील आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व आद्य क्रांतिकारक भागोजी नाईक ह्या महापुरुषांच्या त्रिशिल्प स्थळी महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड च्या वतिने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या १७८ व्या बलिदान निमित्ताने यांच्या त्रिशिल्पाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की भारत भूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी अन्य अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणार ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध शस्त्र बंड पुकारले त्यांना इंग्रजांना साळुकी पळू करून सोडले राघोजींचे संघटन कौशल्य चांगले होते.

त्यांना मुळा खोरे, चाळीसगाव डांगाण, बारागाव पठार या परिसरातून विविध जातीजमातीचे अनेक तरुण येऊन मिळाले. अन्यायी अत्याचारी सरकार, सावकार, जमीनदार यांच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम राघोजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. राया ठाकर, देवजी आव्हाड हे त्यांचे सहकारी. पुढे त्यांनी कोतुळ राजूर व खीरवीरे परिसरातील जुलमी व अत्याचारी सावकारांवर धाडी टाकल्या. त्याची संपत्ती लुटून गोरगरिबांना वाटून टाकली, तसेच सावकारांनी कब्जा केलेल्या जमिनींचे सर्व कागद व दस्तऐवज यांची होळी केली. महिलांवर हात टाकणाऱ्या सावकारांचे कान, नाक कापले. राघोजींच्या वाढत्या दबदब्यामुळे या भागातील सावकार व जमीनदार आपले सर्व अधिकार सोडून अकोले व संगमनेर परिसरात गेले. पुढे राघोजींनी सावकारशाही विरोधातील लढा अधिक व्यापक करत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवण येथील सावकारशाहीविरुद्ध संघर्ष केला.आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना २ मे १८४८ रोजी ठाणे सेंट्रल जेल येथे फाशी देण्यात आली देशाच्या स्वातंत्र्य युद्धात व अन्याय आत्याचारा विरुद्धच्या लढ्यात आद्य.क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे खूप मोठे योगदान होते अशा क्रांतिकारकास विनम्र अभिवादन.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले व प्रास्थाविक विजय मुठे यांनी केले तर ऋषिकेश निचळ आभार यांनी मानले.यावेळी काॅम्रेड हरिभाऊ तांबे यांना आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास महामित्र दत्ता वायचळे, काॅम्रेड हरिभाऊ तांबे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,संजय शिंदे ऋषिकेश निचळ रमेश आव्हाड रोशन आव्हाड किरण गाडेकर सदिप मुठे गणेश पाटिल योगेश क्षत्रिय आदि.उपस्थित होते.
