
निफाड (प्रतिनिधी): शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या स्थानिक विकास निधीतून येथील चांडक कन्या विद्यालय यांना आधुनिक डिजिटल प्रोजेक्टर प्रदान करण्यात आले. विद्यार्थिनींना तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची गोडी लागावी व अध्यापन अधिक प्रभावी व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.याप्रसंगी आमदार दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरीश मुंडे, शिक्षक शिक्षकेतर सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष मधुकर वाघ उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कर्डिले मॅडम यांनी मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले

.डिजिटल प्रोजेक्टरमुळे विद्यार्थिनींना दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण घेणे अधिक सोपे होणार असून आधुनिक शिक्षणपद्धतीला चालना मिळणार आहे. शिक्षक वर्गानेही या उपक्रमाचे स्वागत करत आमदार किशोर दराडे यांचे आभार व्यक्त केले.
