
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२३६ वा दिवस
प्रिय वत्सा! कोणतीही व्यक्ती वा कोणतेही राष्ट्र दुसऱ्याविषयी घृणा बाळगून जिवंत राहू शकत नाही. ज्याक्षणी भारतीयांनी म्लेंच्छ हा शब्द शोधून काढला आणि दुसऱ्या राष्ट्राशी संबंध तोडून टाकला त्याक्षणीच भारताच्या कपाळी सत्यानाश लिहिला जाईल. इतर देशातील लोकांविषयी हा असला मनोभाव तुमच्यात कदापी शिरणार नाही याविषयी सतत जाणीवपूर्वक खबरदारी घ्या. वेदांताच्या गोष्टी नुसत्या बडबडणे सोपे आहे, पण त्यामधील एखादे लहानसे तत्व देखील आचरणात आणणे किती कठीण आहे. माझा ईश्वरावर पूर्ण विश्वास आहे, माणसांवर पण आहे. दिन दुःखी जनतेला सहाय्य करणे हे महत्कार्य आहे. पण सेवेसाठी नरकात देखील जाण्याची तयारी असणे हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे असे मी मानतो.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र २० शके १९४८
★ चैत्र वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १० एप्रिल २०२६
★ १९६५ विदर्भात शिक्षण प्रसाराचे महत्वपूर्ण कार्य करणारे, स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा स्मृतीदिन
★ १९८२ भारताचा पहिला उपग्रह “इन्सॅट वन” याचे अंतराळात यशस्वी उड्डाण.
★ २००० सुप्रसिध्द संस्कृत पंडित, विवेकानंद केंद्र प्रार्थनेचे रचेता डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर दादासाहेब यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
