
नाशिक ( प्रतिनिधी ). मानवी भावभावनाचा विस्तृत अविष्कार शब्दबध्द करताना. निर्माण झालेली तिच्या कथा मानवी मनाचा अध्याय उलगडत जातात स्वताचा शोध घेता आला पाहिजे.असे
प्रतिपादन मानसी म्हसकर यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात २४६ वे पुष्प गुफंताना तिच्या कथा या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलकाताई दराडे होत्या.
मानसी म्हसकर पुढे म्हणाल्या की,समाज परिवर्तन मध्ये स्री केद्रस्धानी असते. परिस्थिवर मात करत त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करते.जिवन सुख दुखाचा लंपडाव आहे. नियतीला झुगारून आनंद शोधण्यासाठी तीने केलेली धडपड असे पैलू विविध कथामधून उलगडत जातात. दोन भुमिका पार पाडणारी स्री दोन संगमावर उभी राहून सुंदर मध्य साधण्याचा प्रयत्न करते. अनेक घटनाचा प्रवास वेगळ्या विश्वात घेऊन जाते.१० कथा असलेल्या या कथासंग्रहातुन नायीका किती प्रगल्भ विचार करून ती ठाम उभी राहते याचे चित्रण माडण्याचा प्रयत्न
केला आहे.
यावेळी साहेबराव उगले अजित कुलकर्णी या भाग्यवान श्रोत्याना ग्रथंभेट देऊन सन्मानीत करण्यात आले.
सुनंदा पाटील यांनी आभार मानले तर सुरेश पवार यानी सुत्रसंचालन केले.
दरम्यान येत्या ७ एप्रिल रोजी उषा शिरसाठ शेवती चाफा या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
