
मोहाडी ( प्रतिनिधी ) दिंडोरी तालुक्यातील के आर टी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मोहाडी मध्ये कार्यरत असलेले श्री प्रदिप एकनाथ जाधव अर्थात अण्णा यांचा सेवापूर्ती सोहळा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस श्री नितिन भाऊ ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सुरुवातीला सर्व उपस्थितांनी प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन केले. डॉ विलास देशमुख यांनी प्रास्ताविक मांडले. सत्कारमूर्ती श्री प्रदिप एकनाथ जाधव सर व त्यांची सुविद्य पत्नी सौ ज्योती प्रदिप जाधव यांचा सत्कार करण्यात आला.तसेच ५८ दिवे लावून श्री प्रदिप जाधव सरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अतिथी मनोगतात श्री शहाजी दादा सोमवंशी, श्री आर आर शिंदे सर, श्री बी आर पाटील सर, श्री शिवाजी शिंदे सर,श्री डी डी शिंदे सर,श्री पाचोरकर मामा, श्री सोनवणे सर, डी जी भवर सर यांनी प्रदिप जाधव सर यांनी कारकीर्दीत केलेले सहकार्य व त्यांची काम करण्याची हातोटी याबद्दल माहिती दिली. चिरंजीव भूषण जाधव व कन्या शितल लोखंडे यांनी त्यांच्या वडिलांबद्दलच्या भावना व त्यांनी सेवेत असताना केलेले काम या विषयी माहिती दिली.त्यांची भाची शुभदा कोल्हे यांनी सेवापुर्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. उपस्थित आजी माजी मुख्याध्यापक यांचा सत्कार सन्माननीय सरचिटणीस श्री नितिन भाऊ ठाकरे तसेच स्वागत सन्माननीय संचालक श्री प्रविण नाना जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात श्री नितिन भाऊ ठाकरे यांनी सत्कारमूर्ती श्री प्रदिप एकनाथ जाधव यांच्या ३८ वर्षांच्या सेवेत केलेल्या कार्याचा गौरव केला केला व संस्थेच्या शाखांमध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांचे आभार देखील मानले.यानंतर खासदार श्री भास्कर भगरे सर यांनी श्री प्रदिप जाधव सर व प्रविण नाना जाधव हे दोन्ही भाऊ त्यांचे वडील स्व एकनाथ भाऊ जाधव यांचे कार्य पुढे चालू ठेवत असल्याचे सांगितले. सत्कारमूर्ती श्री प्रदिप एकनाथ जाधव यांनी म वि प्र संस्थेत सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल तात्कालीन संचालक श्री संपतराव घडवजे यांचे आभार मानले. तसेच सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानले. वडील किंवा भाऊ पदावर असताना गैरफायदा न घेता विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम केले असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमासाठी खासदार श्री भास्कर भगरे सर, श्री नितीन भाऊ ठाकरे श्री डी बी अण्णा मोगल,श्री दिलीप दळवी श्री सयाजीराव गायकवाड,श्री आर के बच्छाव,श्री प्रविण नाना जाधव श्री संपतराव घडवजे, श्री उत्तमकाका जाधव,श्री सी डी शिंदे सर, शिक्षणाधिकारी श्री भास्कर ढोके सर,श्री शशिकांत मोगल सर, श्री विलास देशमुख सर,श्री शहाजी दादा सोमवंशी,श्री बी आर पाटील सर ,श्री विजय जाधव सर,श्री सुरेश सोमवंशी सर, श्री रामराव पाटील, श्री दिपक देशमुख, श्री रवीआप्पा जाधव,श्री जी एम गायकवाड, श्री जाधव एस एस सर,आय टी आय प्राचार्या श्रीमती वारुंगसे मॅडम,सरपंच सौ आशाताई लहांगे, उपसरपंच सौ भाग्यश्रीताई जाधव श्री प्राचार्य श्री शिवाजी शिंदे,उपप्राचार्य श्री अशोक गोसावी, पर्यवेक्षक श्री संजीव पठाडे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री धनंजय देशमुख सर यांनी केले.
