
नाशिक (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक महासंघ नाशिक जिल्ह्याच्या वतीने आज इयत्ता १ली च्या वर्ग शिक्षकांसाठी (HPC) हॉलिस्टेक कार्ड मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली या कार्यशाळेत उद्घाटक म्हणून मा. संजयकुमार राठोड (शिक्षण उपसंचालक) नाशिक विभाग, नाशिक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे मा. साईलता सामलेटी मॅडम (शिक्षणाधिकारी) प्राथमिक जि प नाशिक मा. डॉ. स्मिता चौधरी (प्रशासनाधिकारी) मनपा शिक्षण मंडळ नाशिक, मा. रंजना लोहकरे (प्राचार्य) डाएट नाशिक. तज्ञ मार्गदर्शक म्हणून मा. डॉ.बाबासाहेब पवार (केंद्रप्रमुख) अहिल्यानगर, मा. कानिफनाथ साठे (उपशिक्षक) अहिल्यानगर, मा. डॉ बाबासाहेब बडे (अधिव्याख्याता) डाएट नाशिक यांनी नाशिक जिल्ह्यातील इयत्ता १ ली ला शिकवणारे ४०० शिक्षकांना आज ( HPC)हॉलिस्टेक कार्डवर कार्यशाळा घेण्यात आली.
महासंघाने याप्रमाणे प्रशिक्षण घेतल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी नाशिक खाजगी प्राथमिक महासंघाचे कौतुक केले व राज्यातील सर्व शिक्षक *संघटनांनी याप्रमाणे गुणवत्तेवरती कार्यशाळा घ्याव्यात असे वक्तव्य केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे नाशिक *(जिल्हाअध्यक्ष) श्री नंदलाल धांडे व (सचिव) सुनील बिरारी व मीनाक्षी गायधनी मॅडम, अविनाश साळुंखे, दादाजी अहिरे, हरीकृष्ण सानप सर्व पदाधिकारी उपस्थित होते*.
