
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२३५ वा दिवस
आपले भले व्हावे अशी तुमची मनोमन इच्छा असेल तर तुमचे हे सारे विधी, सारे उपचार झुगारून द्या व जिवंत ईश्वराची पूजा सुरू करा. मनुष्याचे रूप धारण करणाऱ्या प्रत्येक प्राण्याची, त्या मानव ईश्वराची, ईश्वराच्या विश्वात्मक तसेच व्यक्तिगत रूपांची पूजा करा. हे अवघे जग म्हणजे ईश्वराचे विश्वात्मक रूप होय. त्याची पूजा करायची म्हणजे त्यांची सेवा करायची, हे खरेखुरे कर्म होय. विधीअनुष्ठानांत गुरफटून जाणे हे काही खरेखुरे कर्म नव्हे. ईश्वराच्या विश्वात्मक स्वरूपाच्या पूजेचे शिकवण सर्वांना करुन द्या. आपापसात वादविवाद, भांडून, तंटा करून काही उपयोग होणार नाही आपण सर्वांशी मित्रत्वाने, प्रेमाने वागले पाहिजे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र १९ शके १९४८
★ चैत्र वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ९ एप्रिल २०२६
★ १८२८ समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी उर्फ ‘सार्वजनिक काका’ यांचा जन्मदिन.
★ २००१ दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचा स्मृतीदिन.
★ जलसंधारण दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
