
ओझर: वार्ताहर
येथील मविप्र संचलित बोरस्ते विद्यालयाच्या इ सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘शिवचरित्र’ प्रकल्प तयार केला असून त्यात शिवरायांचे बालपण, जिंकलेले गड किल्ले व पोवाड्यांची माहिती लिहिली असून इ सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘प्राचीन इतिहास’ या विषयावर प्रकल्प तयार केला यानिमित्त मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्याहस्ते नोंदवही, प्रमाणपत्र बक्षीस देण्यात आली. शिक्षिका संगीता सोनवणे, सुप्रिया भंडारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर प्रकल्प शेजवळ स्वरांजली चौधरी सर्वस्वी ढिकले इसीका कदम श्रेया वाघ आराध्या सपाटे गौरी शहाणे ऋतिका मौले रुद्र पगार श्रावणी अपूर्वा माळी श्रेया गालट सोनार पियुष मोरे तन्वी पवार दिव्या स्वरा आव्हाड या विद्यार्थिनींनी गणित विषयाचा प्रकल्प तयार केल्याबद्दल त्यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन केले आहे.
