
एक दुःखद वार्ता वाचली आणि गत बारा वर्षांपूर्वीच्या आठवणींनी जागृती झाली .मी जनता विद्यालय पवन नगर येथे मुख्याध्यापक म्हणून असताना एक दिवस अचानकपणे ज्यांच आज निधन झालं ते कैलासराव चौधरी आणि त्यांच्या बरोबर एक पाहुणे अचानकपणे ऑफिसमध्ये आले .दुपारची वेळ होती गप्पागोष्टी झाल्या चहापाणी झाले आणि चौधरी साहेबांनी मूळ विषयाला हात घातला. त्यांनी मला सांगितले सर हे पाहुणे आपल्या विद्यालयाला उद्या त्यांच्या असलेल्या वाढदिवसा निमित्ताने काहीतरी भेट वस्तू देऊ इच्छिता शाळेसाठी उपयुक्त असलेल्या वस्तूंची यादी सांगा त्यातले काय देता येईल हे ते विचार करतील आणि आपल्याला वाढदिवसाच्या निमित्ताने ते भेट देतील .मला आश्चर्य वाटलं एखादी व्यक्ती स्वतःहून येते आणि विद्यालयाला भेट वस्तू देऊ इच्छिते हे थोडेसे अनपेक्षित होते. आधी पाहुण्यांचा परिचय करून घेतला पाहुणे नाशिक मधिलच सुविधा गॅस एजन्सी चे मालक होते सिडको परिसरात असलेल्या या गॅस एजन्सीचे हे मालक म्हणजे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे बंधू श्री भरत पिचड होते .
……. प्रथमतः पाहुण्यांना संपूर्ण ईमारत दाखवली ईमारत बघून त्यांना आनंद वाटला आणि त्यांनी अंतिमता ठरवले की या विद्यालयासाठी मोठ्या डस्टबिनची गरज आहे .कै. कैलासराव वसंतराव चव्हाण यांच्याशी सखोल चर्चा करून विद्यालयाला चाके असलेली सहा प्लास्टिकचे ब्रॅण्डेड डस्टबीन देण्याचे निश्चित केले हे डस्टबीन उत्तम क्वालीटीचे होते त्यांना चाके असल्यामुळे व बंद करण्यासाठी झाकणे असल्यामुळे ते सहजपणे वापरता येत होते. वर्गांच्या बाहेर व्हरांड्यात ठेवता येणे शक्य होते त्यामुळे वरच्या मजल्यासाठी तीन आणि खालच्या मजल्यावर तीन असे सहा डस्टबीन तेव्हा पिचड साहेबांनी कैलासराव चौधरी यांच्या सल्ल्याने, आम्हाला दुसऱ्या दिवशी आणून दिले ते स्वीकारताना या दोन्ही महान विभुतिंचे मी स्टेजवर सर्व विद्यार्थ्यांसमोर आभार मानून पिचड साहेबांना वाढदिवसाच्या विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, ह्या दोन्ही व्यक्ती माननीय माजी संचालक नानासाहेब महाले यांच्या अतिशय जवळचे मित्र होते.. महाले साहेब आणि कैलासराव चौधरी यांचे संबंध संपूर्ण परिसरास अतिशय चांगल्या प्रकारे माहीत होते .आज आमच्या विद्यालय परिवारा प्रमाणेच नानासाहेब महाले यांचा संपूर्ण परिवार सुद्धा शोक सागरात बुडाला असेल हे सांगणे न लगे .
कै.कैलासराव वसंतराव चौधरी यांना दुःखद अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली.
परमेश्वर कैलासराव यांचे आत्म्यास चिर शांती देवो हीच प्रार्थना.
आपला शोकाकुल
श्री अशोक एम.देवकर सर.
