
तासगाव ( प्रतिनिधी ) तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातील लोकप्रिय आमदार रोहितदादा आर. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आर. आर. पाटील एज्युकेशन ट्रस्ट, मुंबईच्या वतीने मांजर्डे येथील बौद्ध विहारात पाचवी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एकूण एकोणपन्नास विद्यार्थ्यांना रोख रकमेचे धनादेश देऊन शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले

.या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत सीताराम रणखांबे, जि. प. सदस्य मोहन नाना पाटील, मा. सभापती कमलताई दिनकरदादा पाटील, सरपंच संध्याराणी मंडले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार रोहित पाटील म्हणाले, “बौध्द तसेच वंचित प्रत्येक घटक पदवी व पदवीत्तर शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहावा हा उदात्त हेतू ठेऊन आर. आर. पाटील एज्युकेशन ट्रस्ट मुंबई काम करीत आहे..” असे गौरव उद्गार काढले. पुढे बोलताना त्यांनी ट्रस्ट व डॉ. रणखांबे यांच्या कार्याचे कौतुक केले. ट्रस्टची व्याप्ती आणखी वाढवण्याचे व प्रत्येक गावामध्ये उपक्रम रबविण्याचे सांगून सर्व विद्यार्थांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी विशेष सत्कार सांगली जिल्ह्यातील प्रथम महिला आय.आर.एस. (इंडियन कस्टम) अधिकारी सुधा श्रीकांत रणखांबे यांचा करण्यात आला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित ‘बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे मानकरी साहित्यिक नवनाथ रणखांबे आणि राष्ट्रपती पदक विजेते ‘रुबाब’ चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर रणखांबे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी युवा नेते राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट ) सांगली अध्यक्ष सुशांत पाटील, प्रदेश सचिव राष्ट्रवादी ताज्जूद्दीन तांबोळी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विश्वासतात्या पाटील, संगम पाटील, उमेश मोहिते, शिवनेरी केसरी विजेते पै. लक्ष्मण मंडले, कापूर अग्रनीचे संस्थापक विनायक तात्या मोहिते, लक्ष्मी इंडस्ट्रीचे मालक संजय काका पाटील, कुमार जाधव, प्रकाश दादा मोहिते आदी. सह ट्रस्टचे पदाधिकारी, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, मांजर्डे ग्रामपंचायत सदस्य, बौद्ध समाज आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष बबन रणखांबे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत पाटील यांनी केले तर आभार नवनाथ आनंदा रणखांबे यांनी केले.
