नाशिकरोड ( प्रतिनिधी):- जिल्ह्यातील शिक्षकांची अग्रगण्य संस्था असणाऱ्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स ॲण्ड नॉन टीचिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संग्राम शिवाजीराव करंजकर यांचा नासाका माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे, पुंजाजी काकड, विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार आणि शिक्षक-कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संग्राम करंजकर यांचा विद्यालयाच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. सुधाकर गोडसे यांनी श्री.करंजकर हे नासाका माध्यमिक विद्यालयात कार्यरत असल्याने हा विद्यालयाचाही सन्मान असल्याचे गौरवोदगार काढले. श्री.करंजकर यांनी सत्काराला उत्तर दिले. विद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.