
नाशिकरोड( प्रतिनिधी):- पळसे आणि परिसराची अर्थवाहिनी असलेल्या आणि वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या धनसमृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षात सहा लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष शामराव गायधनी, उपाध्यक्ष शरद ढमाले, जनसंपर्क संचालक मनोज गायधनी, कर्ज समिती अध्यक्ष भारत ढेरिंगे, कार्यकारी संचालक किरण ढेरिंगे यांनी दिली.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, संस्थेचा मार्च अखेरचा नेट एनपीए शून्य टक्के असून भाग भांडवल २६ लाख रुपये आहे. यंदाच्या प्रथम आर्थिक वर्षात चार कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचा सीडी रेशो ६५ टक्के आहे. संस्थेने पहिल्याच वर्षी इतकी नेत्रदीपक प्रगती केली असल्याचे संस्थेचे संचालक इंद्रभान जाधव, विजय वाणी, अमोल जाधव, राहुल धात्रक, कोमल तुंगार, ज्योती जाधव, निलेश मोरे, नितीन ढेरिंगे, कर्मचारी पूजा टावरे, काजोल गायधनी, आरती दयाळ यांनी सांगितले.
