
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२३४ वा दिवस
आमचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा ईश्वर समजूनच योग्य तो सन्मान केला पाहिजे. त्याच्याशी व्यवहार करायला हवा. दुसऱ्या व्यक्तीविषयी कोणत्याही प्रकारची घृणा, इर्षा, द्वेषभावना बाळगता कामा नये. दुसऱ्याची निंदा कदापी करता कामा नये. दुसऱ्याचे अनिष्ट करता कामा नये आणि हे केवळ संन्याशाचेच कर्तव्य आहे असे नाही तर समस्त स्त्री पुरुषांचे हे कर्तव्य आहे. आमचा असा विश्वास आहे की समस्त वेद, दर्शने, पुराणे, स्मृतीग्रंथे व तंत्रशास्त्रे यामध्ये कुठेही असे म्हटलेले नाही की आत्म्याच्या ठिकाणी कोणताही लिंगभेद, पंथभेद, धर्मभेद वा जातीभेद आहे. त्याच्या ठाई अपूर्णता देखील नाही. तर आत्म्यास पूर्णत्व प्राप्त आहे. आत्मा ईश्वरी अंश नसून तो पूर्ण ब्रम्ह आहे. म्हणजे पूर्णतः ईश्वरच आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र १८ शके १९४८
★ चैत्र वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ८ एप्रिल २०२६
★ १८५७ – १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे – यांना फाशी स्मृतीदिन.
★ १८९४ बंगाली कादंबरीकार, लेखक, कवी, पत्रकार, आनंदमठ या कादंबरीत ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत रचणारे कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा स्मृतीदिन
★ १९५३ प्रसिध्द उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा स्मृतीदिन.
