
कुसुमाग्रज प्रतिष्ठान नासिक यांचे वतीने श्री रामदास जगताप व्यवस्थापक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान कडुन ग्रंथ भेट पत्र स्वीकारताना सुहास टिपरे जेष्ठ साहित्यिक
नासिक(; प्रतिनिधी ) कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नासिक या नामांकित संस्थे ला जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांनी 15 ग्रंथ भेट म्हणुन दिले आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान चे सह कार्यवाह आडवोकेट राजेंद्र डोखळे यांनी प्रतिष्ठान कडुन पोहोच देऊन सुहास टिपरे यांच्या उपक्रम चे कौतुक केलें आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान वरील असलेले प्रेम हे अधिकच वृद्धिंगत होईल व भविष्यात ही असेच सहकार्य मिळेल असा विश्वास कुसुमाग्रज प्रतिष्ठान ने व्यक्त केला आहे. या आधी ही सार्वजनिक वाचनालय ला सुहास टिपरे यांनी 60 ग्रंथ भेट दिलेले आहेत तर नारायण सुर्वे वाचनालय सिडको यांना सुद्धा अनेक वेळा अनेक ग्रंथ भेट म्हणून दिले आहेत. ग्रंथ भेट देऊन वाचन चळवळ कशी वाढवता येईल मोबाईल चा वापर कमी करून वाचनासाठी मुलांनी कसा प्रयत्न करावा, वाचन कसे करावे या साठी सिडको च्या इंग्लिश शाळा मदर तेरेसा स्कूल, मॉडर्न इंग्लिश स्कूल शिवाजी चौक ग्लोबल इंग्लिश स्कूल अश्विनी नगर च्या शाळेत जाऊन विद्यार्थी यांना उपयुक्त पुस्तके वाचना साठी प्रवृत्त केलें आहे. या ची दखल घेऊन किड्स किंगडम एज्युकेशन सोसायटी नासिक यांनी खास कार्यक्रम मध्ये सुहास टिपरे यांस ज्ञान दर्पण पुरस्कार देऊन सन्मानित केलें आहे. जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांच्या उपक्रम चे रामदासजी जगताप, ऍडव्होकेट राजेंद्र डोखळे सहकार्य वाह कुसुमाग्रज प्रतिष्ठान नासिक व अन्य मान्यवर यांनी भेट दिलेल्या पुस्तकांचा वाचक यांचे साठी अतिशय चांगला उपयोग होणार असल्याचे नमूद केलें आहे व प्रतिष्ठान यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे!!!
